Pune Crime News : पुण्यातील महिलेचा खून करून उत्तर प्रदेशात पसार झालेल्या सुखाबिंदाला अखेर अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रज परिसरातील एका महिलेचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला होता. तिच्या अंगावरील दागिने चोरून नेण्यात आले होते. हा खून या महिलेच्या घराजवळच (Pune Crime News) राहणाऱ्या सुखाबिंदा उर्फ बादल उर्फ सूग्गा बनवारी बिंदा (वय 27) याने केला होता. खून केल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जाऊन आरोपीला अटक केली आहे. 

पारूबाई किसन सावंत (वय 65) या महिलेचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी होऊन झाला होता. पारूबाई या 11 जुलै रोजी घरात एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपीने घरात शिरून त्यांचा गळा दाबून खून केला आणि त्यांच्या अंगावरील दागिने घरातील रोख रक्कम चोरून नेले होते. घटनेनंतर आरोपी पसार (Pune Crime News) झाला होता. दरम्यान पोलिसांना सुखाबिंदा याच्यावर संशय होता म्हणून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

 

Pimpri News: शिवसेनाला धक्का! खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात; निवासस्थान, संपर्क कार्यालयाबाहेर बंदोबस्त

 

 

आरोपीने जाताना आपण वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी तो खून करून पाहिला होता. तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणी एक पथक पाठवून 15 जुलै रोजी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Pune Crime News) सुनावली आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.