Pune Crime News : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा, एकाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Pune Crime News) अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची सुटका करून एकास केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) दुपारी पिंपळे करण्यात आली.

 

अनसराज अण्णाराव माने (वय 35, रा. पाचपीर चौक, काळेवाडी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune Crime News : पुण्यातील महिलेचा खून करून उत्तर प्रदेशात पसार झालेल्या सुखाबिंदाला अखेर अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीमध्ये आरोपी आरोग्य मंथन स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होता. त्यात त्याने तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी (Pune Crime News) प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून कारवाई करत स्पा सेंटर चालक मालकाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.