Nigadi : अत्याधुनिक यंत्राद्वारे मोफत मुख कर्करोगाची तपासणी

एमपीसी न्यूज – जागतिक तंबाखू निषेध दिना निमित्ताने फेस डेंटल इटरनॅशनल क्लिनिकच्या वतीने 31 मे ते 7 जूनपर्यत ओरल कर्करोग प्रतिबंधक उपक्रम राबवत आहोत. त्या निमित्ताने आठवडाभर तोंडाच्या कर्करोगाविषयी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. तसेच निगडी आणि चिंचवड येथील अत्याधुनिक दाताच्या दवाखान्यातही या विषयी माहिती देण्यात येणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणार्‍या दुष्परिणामांची फक्त तंबाखूचे मिश्री, गुटका आणि मद्यपान यांच्या सेवनाने होणार्‍या दुष्परीणामावर मात करुन मौखिक आरोग्य चांगले ठेवूनस्वस्थ जीवन कसे जगता येईल.

  • कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर जीव वाचवणे शक्य होते, त्यासाठी या सप्ताहात आमच्या सेंटरमध्ये अत्याधुनिक यंत्रद्वारे मोफत तपासणी करुन, आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबास मूक कर्करोग – तोंडाच्या कर्करोगापासून वाचवू इच्छितो. याबाबत फेस अ‍ॅण्ड डेटल केअरचे संचालक डॉ.गौरी पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरात ज्यांना तंबाखू, गुटका, मिश्री इत्यांदीची सवय आहे ती युक्त्या व कुल्पत्या माध्यमातून सोडविण्यासाठी येणार्‍यांची तपासणी दि.7 जून, 2019 रोजी सकाळी 11 वाजता फेस व डेंटल केअर सेंटर येथे आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, पी स्केअर, सेक्टर नं.26, प्लॉट नं.1, पिं.चिं. पॉलीटेक्नीक कॉलेजजवळ, प्राधिकरण, पुणे – 44 येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.