Nigdi : दुचाकीस्वाराचे 60 हजारांचे ब्रेसलेट पळवले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरुन जात असलेल्या इसमाच्या हातातील सुमारे 60 हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट अनोळखी दोन चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.

मनिष शंकर आंगणे (वय 48, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावरून दुचाकीवर जात होते. ते आकुर्डी येथे आले असता त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी मनीष यांच्या हातातील 60 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट हिसका मारून चोरून नेले. त्यानंतर चोरटे टिळक चौकाच्या दिशेला पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.