Nigdi News : निगडीतील साहिल बिरजे यांची संरक्षण दलात कमिशन ऑफिसर लेफ्टनंट पदावर नियुक्ती

एमपीसी न्यूज – निगडी येथील विजय बिरजे यांचे (Nigdi News) सुपुत्र साहिल विजय बिरजे यांची भारतीय संरक्षण दलात कमिशन ऑफिसर लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. ते मंगळवार पासून सेवेत रूजू होणार आहेत.

साहिल यांचे शालेय शिक्षण हे देहुरोड येथील केंद्रीय विद्यालय येथून झाले आहे त्यामुळे त्यांचे लहानपणापासून लष्करात भरती होण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी एनडीए ची लेखी व मुलाखतीचे शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून घेतले, त्यासाठी त्यांना बलजितसिंग गील व ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात ते उत्तीर्ण झाले. त्यांनी या प्रशिक्षणाच्या जोरावर परिक्षेमध्ये देशात 58 वा क्रमांक मिळवून एनडीएच्या 141 व्या तुकडीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर बिरजे यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही त्यांचे पुढील प्रशिक्षण हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथून झाले.

Hinjawadi : श्वानाची विचारपूस करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

मुळात घरात मिलीटरी चा कोणताच वारसा नव्हता साहिल यांचे वडील हे व्यावसायिक असून आई या गृहिणी आहेत. केवळ त्यांची जिद्द व घरच्यांनी दिलेली साथ (Nigdi News) यामुळे ते संरक्षण दलात मोठ्या हुद्द्यावर पोहचले आहेत. साहिल बिरजे यांची भारतीय संरक्षण दलात कमिशन ऑफिसर लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.