Nigdi : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना दळवीनगर निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉप समोर मंगळवारी (दि. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

गणेश दत्ता लकडे (वय 19, रा. दळवीनगर, पत्राशेड झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) या तरुणाने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॅनी उर्फ जाकीर पठाण (रा. ओटास्कीम, निगडी) आणि बिब्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश आणि त्याचा मित्र दोघेजण दळवीनगर मधील पीएमपीएमएल बस स्टॉप समोर रस्त्याच्या बाजूला बोलत बसले होते. गणेश याचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गणेश याला मारहाण केली. तसेच आरोपी डॅनी याने लोखंडी कोयत्याने गणेश याच्या कपाळावर मारले. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.