Nigdi : ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : ट्रक व दुचाकीच्या (Nigdi Accident) अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला. भोसरी – निगडी रस्त्यावर दुर्गानगर हा चौक आहे. या चौकामधून यमुनानगर, टिळक चौक, त्रिवेणीनगर चौक व थरमॅक्स चौक येथे जाता येते. नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका पुरुष दुचाकीस्वाराचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याला ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला.

स्थानिक नागरिक बाबा परब म्हणाले, की ट्रक निगडीहून भोसरीला जात असताना अपघात झाला. दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Talegaon Dabhade : सामाजिक बांधिलकी जपून मदत करणार – वैशाली दाभाडे

यमुनानगर रहिवासी सखाराम सोलंके (Nigdi) म्हणाले, की दुर्गानगर चौक हा निगडीमधील एक महत्त्वाचा चौक आहे. येथे वाहतूक सिग्नल आहे; पण वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे वाहनचालक वाहतूक नियम पाळत नाहीत. त्यामुळे दररोज छोटे अपघात होत असतात. पण, आज खूप मोठा अपघात होऊन त्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ म्हणाले, की “दुर्गानगर चौकात अपघात घडला आहे. मी पोलीस पथकासोबत घटनास्थळी चाललो आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.