Nigdi : निगडी, हिंजवडीमध्ये वाहनचोरीचे दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – निगडी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 17) वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख 88 हजार रुपयांची दोन वाहने चोरून नेली आहेत.

वाहन चोरीची पहिली घटना आकुर्डी येथे हिरा बेकरीसमोर घडली. सुरज कुमार शिवनाथ सिंग (वय 42, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची एम एच 12 / क्यू ई 1995 ही रिक्षा 8 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता आकुर्डी येथील हिरा बेकरीसमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरून नेली. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची दुसरी घटना मोरया मंदिराजवळ चिंचवड येथे घडली. आशुतोष अशोकराव टांकसाळे (वय 37, रा. गौरी अपार्टमेंट, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टांकसाळे यांनी त्यांची 1 लाख 7 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ बी 7486 ही बुलेट 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेट चोरून नेली. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like