Nigdi Crime News : दोन फरार आरोपींना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी येथे करण्यात आली.

ऋतिक अनिल सकट (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), आदित्य किशोर बाविस्कर (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस शहरात गस्त घालत होते. भोसरी येथील जय गणेश साम्राज्य चौकात पोलीस आले असता पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबर मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जय गणेश साम्राज्य चौकात थांबले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी ऋतिक आणि आदित्य या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून निगडी परिसरात एक मारहाणीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.