Nigdi : गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे बुजवा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाआधी शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावेत. भक्ती शक्ती चौक ते दापोडी व भक्ती – शक्ती चौक ते दुर्गानगर चौक हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्यात याव. निगडी भक्ती शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली.

Dehuroad : श्री शिवाजी विद्यालयात स्काऊट गाईडचे रक्षाबंधन

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी ते दापोडी हा शहरातील मुख्य रस्ता आहे. कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग, त्याचप्रमाणे महिलांची मोठी वर्दळ असते. हा रस्ता विकसित करून सुशोभीकरण करण्यात यावा.

तसेच या रस्त्यावर योग्य त्या अंतरावर ठिकठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. रस्त्यावर ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता संपूर्णपणे डांबरीकरण करावा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.