Nigdi : विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची बसला धडक; वाहनांचे नुकसान, दुचाकीस्वार जखमी

Hit a two-wheeler coming from the opposite direction; Damage to vehicles, bikers injured

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या बसला धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी पावणेआठ वाजता संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोर घडली.

धनराज देवराव पाटोळे (वय 32, रा. गणेशनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक मुरलीधर राऊत (वय 26, रा. साने चौक, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनराज हे टुरिस्ट बसवर (एमएच 14 / सीडब्ल्यू 5896) चालक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी फिर्यादी संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोरून जात होते. त्यावेळी आरोपी प्रतीक स्कुटीवरून (एमएच 14 / डीके 1459) विरुद्ध दिशेने आला.

दुचाकी वेडीवाकडी चालवून आरोपीने फिर्यादी यांच्या बसला समोरून धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  तसेच आरोपी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.