Movie On CoronaVirus: राम गोपाल वर्माचा ‘कोरोना व्हायरस’वर चित्रपट, पाहा ट्रेलर

Ram Gopal Varma Releases Trailer of His Latest coronavirus Movie

एमपीसी न्यूज- वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि हटके चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सर्व जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर आधारित असलेला राम गोपाल वर्मा यांचा ‘कोरोना व्हायरस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये चित्रित केलेल्या या तेलगू चित्रपटाचे नाव ‘कोरोना व्हायरस’ आहे. कोरोना व्हायरसवर आधारित हा जगातील पहिलाच चित्रपट असल्याचा दावा करण्याता आला आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यात बातम्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त भितीदायक कोरोनाच्याच बातम्या दिसतायेत. जेव्हा घरातल्या मुलीलाच खोकला होतो. तेव्हा या चित्रपटात ट्विस्ट निर्माण होतो.

यानंतर या कुटुंबीयांच्या मनात शंका येते की, या मुलीची कोरोना टेस्ट करावी की नाही, या विचारात ते पडतात. या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रीकांत हे असून चित्रपटाची निर्मिती सीएम क्रिएशन्सने केली आहे.

मंगळवारी (दि. 27) प्रदर्शित करण्यात आलेला हा ट्रेलर सुमारे 20 लाख लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण सिनेमा लॉकडाऊन कालावधीत घरातूनच चित्रित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.