Nigdi : मेट्रो निगडीपर्यंत धावणार, मनसेकडून आंनदोत्सव

एमपीसी न्यूज – निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा ( Nigdi) मार्ग मोकळा झाल्याने मनसेने भक्ती – शक्ती चौक येथे नागरीकांना पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

Maharashtra : विमान अपघातांच्या मालिकानंतर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीला देशभरात बंदी

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा. निगडी पर्यंत मेट्रो असावी अशी सर्व शहरवासीयांची इच्छा होती. परंतु,  पहिला टप्पा पिंपरी ते दापोडी असा झाला. काम ही पूर्ण झाले.

त्यामुळे निगडी पर्यंत मेट्रो येईल का नाही अशी भिती निगडी, आकुर्डी , चिंचवड मधील सर्वसामान्य नागरीकांना होती. निगडीपर्यंत मेट्रोसाठी मनसेने सातत्याने आंदोलने केली. मोर्चे काढले.

आज खऱ्या अर्थाने त्या प्रयत्नांना यश आले निगडी पर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता भेटली आहे . निगडी पर्यंत च्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाची मान्यता भेटल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी ( Nigdi)  म्हटले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.