Nigdi News : मॉडर्न विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संस्कृत पाठांतर स्पर्धेत यश

एमपीसी न्पूज – ए.सो.शिवाजीनगर यांच्या तर्फे दरवर्षी ‘पूजनीय दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर’ स्पर्धा घेण्यात येतात.संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे.भाषा व संस्कृती यांच्या दृष्टीने आज सुध्दा संस्कृत भाषेचे राष्ट्रीय जीवनातील स्थान अलौकिक आहे. (Nigdi News) विविध गटातील विद्यार्थ्यामध्ये बालपणापासूनच संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी,उत्तम संस्कार व्हावेत. वाणी शुध्द व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा शिशु स्तर ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत भगवदगीता श्लोक पाठांतर, नवग्रह स्तोत्रम, भवानी अष्टकम, श्री महालक्ष्मी अष्टकम, मधुराष्टकम पाठांतरा साठी ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत पुण्यातील बहुतांश शाळांमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी सोहम राकेश पडवेकर याने या स्पर्धेत श्री महालक्ष्मी अष्टकम सादर केले व त्यात त्याचा द्वितीय क्रमांक आला.

Pune News : “तू घरी का येत नाही” म्हणत पत्नीवर कुऱ्हाडीने वार

त्याला प्रो.ए. सो.चे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.श्री.गजानन एकबोटे यांच्या उपस्थितीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  कुलगुरु .प्रा.डॉ.श्री.संजीव सोनावणे यांच्या हस्ते संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.(Nigdi News) स्पर्धेसाठी त्याला शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, वर्गशिक्षक कैलास माळी, रेणुका पडवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सोहमने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे व्हीजिटर राजीव कुटे, शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे यांनी त्याचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.