Hadapsar News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मांजराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांनाही मारहाण

एमपीसी न्यूज : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी आणलेल्या मांजराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या चार जणांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केली. पुण्यातील हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला.(Hadapsar News) डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे (वय 51) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून एका महिलेसह चार अनोळखी इसमानविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nigdi News : मॉडर्न विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संस्कृत पाठांतर स्पर्धेत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हडपसर परिसरात पेट क्लिनिक आहे. दहा डिसेंबरच्या रात्री या क्लिनिकमध्ये आरोपी यांनी मांजराला उपचारासाठी आणले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच या मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर फिर्यादी यांनी डॉक्टर यांना धारेवर धरले.(Hadapsar News)  ‘मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या क्लिनिकची तोडफोड करत त्यांना लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.