Pune News : भटक्या कुत्र्याला मारहाण केल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्याला मारहाण केल्याने एका तरुणाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) 7 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. एका 56 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मुन्ना शेख नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मांजराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांनाही मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी फातिमानगर येथील टेन स्क्वेअर सोसायटीत राहतात. फिर्यादी राहत असलेल्या परिसरामध्ये काही भटकी कुत्री आहेत.(Pune News) त्यातील एक तांबड्या रंगाचा आणि दृष्टी कमी असलेल्या टायसन नावाच्या कुत्र्याला मुन्ना शेख यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणी त टायसन याच्या अंगावर आणि तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.