Nigdi News : लोकमान्यमध्ये “आर्थोप्लास्टी डे” साजरा; रुग्णांनी केला रॅम्पवॉक

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोकमान्य हाॅस्पिटलच्या सर्व शाखांमध्ये आज “आर्थोप्लास्टी डे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी असलेल्या रुग्णांना निमंत्रित करण्यात आले होते.

मुख्यतः गुडघ्यावर तसेच खुबा, खांदा, कोपरा या सांध्याच्या ठिकाणी अंतिम टप्प्यातील झीज झाली की सांधेरोपण शस्त्रक्रिया केली जाते. आजकाल उतारवयातील व्यक्तीबरोबरच तरुण वयातील व्यक्तीतही सांधेदुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबद्दल लोकांमध्ये अनभिज्ञता असुन त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

लोकमान्यमध्ये गेल्या वीस वर्षापासुन शरीरातील सर्व सांध्यावर सांधेरोपण शस्त्रक्रिया डाॅ. नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. वीस हजाराहुन अधिक रुग्णांवर त्या यशस्वी झाल्या आहेत. कोविड 19 चा संसर्गाचा धोका लक्षात घेता फक्त 10 रुग्णांना बोलावुन अशा रुग्णांचा सत्कार करण्यात आला. वेदनेने व्याकुळ होवुन चालणेच बंद झालेल्या रुग्णांवर रोबोटीक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया झाल्यानंतर आता चालता येवु लागल्याचा आनंद ओसंडुन वहात होता. ऑपरेशन करणाऱ्या डाॅक्टरसह सहकाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना भावुक होवुन रुग्णांच्या डोळ्यात आनंदाश्रु वहात होते. अशा रुग्णांनी रुबाबदार फेटे बांधुन रॅम्प वाॅक करुन आता आम्ही वेदनारहित चालण्याचा आंनद लुटु शकतो याचे प्रत्यंतर दिले.

ते रुग्ण आहेत असे सांगितल्याशिवाय कळतच नव्हते एवढा त्यांचा वावर सहज होता. याप्रसंगी रुग्णांनी आपले मनोगते व्यक्त केली. मोहन लाला बंगाळे म्हणाले की लोकमान्यने आम्हाला आदरपुर्वक निमंत्रित केलेल्या सत्काराने आम्ही भारावुन गेलो आहोत.खरेतर आम्ही लोकमान्यचा गौरव करायला हवा. कारण त्यांनी आम्हाला परत गुडघ्यावर उभे केले, वेदनामुक्त केले. तेव्हा सर्जरी ची मनात भिती होती.आता वाटते अगोदरच करायला हवी होती. रोबोटीकने दोन्ही गुडघ्यावर सर्जरी झाली.चालता येईल की नाही ही शंका होती.आता मी कुठेही जावु शकतो. सगळं करता येतं नि मुख्य वेदना गेल्या. रॅम्पवाॅक करताना आता जणु काही झालेच नाही असे वाटत होते. ही भावना व्यक्त केली.

डाॅ.नरेंद्र वैद्य म्हणाले की आता सांधेरोपण शस्त्रक्रियेत आमुलाग्र बदल झाला आहे. अगदी जुन्या पद्धतीपासुन संगणक ते रोबोटीक असिस्टनपर्यंतचे प्रगतीचे सर्व टप्पे आम्ही रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सध्याची जीवनशैली पाहता तरुणांमध्येही प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. वाढते वजन कंट्रोल करुन आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारली पाहिजे. तसेच सांध्यांचे दुखणे वेळीच दाखवुन नियंत्रित करायला हवे. ज्यांना हे दुखणे औषधे, गोळ्या, व्यायाम करुनही थांबत नाही त्यांनी वेळ न दवडता उपचार करायला हवे. रोबोटीक असिस्टेड सर्जरीमुळे आता अधिक अचुकता येते. पायातील बाक जातो, चालणे इतर हालचाली सहज तसेच नैसर्गिक होतात. त्यामुळे रुग्णांनी वेदना सहन न करता उपचारांना प्राधान्य द्यायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.