Sangvi Crime News : वैद्यकीय हॅन्डग्लोज देण्याच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वैद्यकीय हॅन्डग्लोजचे 20 हजार बॉक्स देतो, असे सांगून एकाची 59 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.

कृष्णकांत व्ही आणि महिला आरोपी (दोघेही रा. निजाम पेठ, हैदराबाद, तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हर्षल लालचंद धाकड यांच्या वतीने यशोधन मधुकर हराळकर (वय 44 रा. औंध पुणे) यांनी शनिवारी (दि. 17) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2020 रोजी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी हराळकर यांचे मित्र धाकड (सध्या रा. दुबई) यांचा विश्वास संपादन केला. धाकड यांना 20 हजार वैद्यकीय हॅन्डग्लोजचे बॉक्स देतो असे सांगून त्यांच्याकडून 59 लाख 34 हजार रुपये घेतले. तसेच हॅन्डग्लोज न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी धाकड यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता आरोपी कृष्णकांत याने दुसऱ्या आरोपी महिलेची मोठ्या गुंड लोकांची संबंध आहेत. ती तुला संपवून टाकेल, अशी धमकी धाकड यांना दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.