Nigdi News : रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – प्रेम, भाऊबीज, स्वातंत्र्याचा खरा अर्थ, माझा भारत देश, माणूस विरघळतना अशा विविध कविता सादर करत निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ( Nigdi News ) रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा 39 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला.

सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कोषाध्यक्ष राजेंद्र त्रंबके उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.  वर्धापन दिनानिमित्त “चला गुंफूया शब्दांच्या माळा” या स्वरचित कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   त्याच बरोबर ग्रामीण भागातील दोन आदिवासी निवासी शाळांसाठी उपयुक्त असे ग्रंथ दान करण्यात आले.

 

AAP : चेतन बेंद्रे आपमधून निलंबित, कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप

लोकसेवा शिक्षण संस्था, अनुदानित आश्रम शाळा, वाल्हीवरे, मुरबाड, ठाणे येथील मुख्य अधीक्षक दिलीप पवार आणि अधीक्षक संदीप देशमुख उपस्थित होते. या शाळेत एकूण 341 निवासी ( Nigdi News ) आदिवासी मुले आणि मुली आहेत. ह्या वेळी संदीप देशमुख यांनी शाळेची माहिती दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले. अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा,  तळेरान, ता. जुन्नर या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या 600 आहे. अतिशय दुर्गम भागातील या शाळेचे मुख्याध्यापक गणेश नलावडे आणि खोसे सर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. शाळेसाठी पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या मदतीची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमात 15  सहभागी कवींनी अतिशय अर्थपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या स्वरचित कविता सादर केल्या.

त्यामध्ये  प्राची देशपांडे  – प्रेम, सीताराम करकरे – भाऊबीज, अर्चना भांडारकर – लेक, अपर्णा देशपांडे – लखु उस्ताद, नरहरी वाघ – स्वातंत्र्याचा खरा अर्थ, उज्वला ताई –  माझा भारत  देश, राजेंद्र जी करंबळकर – माझं वाचन वेड, शर्मिला देसाई :  माणूस विरघळतना, शरद जोशी : वात्रटिका, शिल्पा बिबिकर – मी पाहिला, संगम कुलकर्णी –  पाऊस, नितीन कुलकर्णी – ग्रंथ, सुमती कुलकर्णी – दोन निरांजन, जयंतन इतराजन आणि विनिता श्रीखंडे यांच्या एकाहून एक सरस कविता सादर झाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले, तर प्रास्ताविक विश्वास ( Nigdi News ) करंदीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनघा देशपांडे यांनी करून दिला. काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता श्रीखंडे यांनी केले,  कमल खांबे यांनी आभार मानले.  पसायदानाने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.