Nigdi News : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –अज्ञात वाहनाच्या (Nigdi News) धडकेत एका 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.23) निगडीतील खंडोबामाळ चौकात घडला आहे.

याप्रकऱणी सचिन हनुमंत  जाधव (वय 35 रा.चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई शांता हनुमंत जाधव (वय 60) या खंडोबामाळ चौक येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहन चालकाने वेगाने गाडी चालवून शांता यांना जोरदार धडक दिली. यावेळी तिथे न थांबता तो गाडी घेऊन पसार झाला. शांता या अपघातात गंभीर जखमी झाल्या व त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.