Chinchwad Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक (Chinchwad Crime News)  संबंध प्रस्थापित करत फसवणूक केली. या प्रकरणी एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2021 या सालापासून 22 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चिंचवडे नगर येथे घडली.

Chinchwad Bye-Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची सांगवीत पदयात्रा, मतदारांचा प्रतिसाद

महिलेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वैभव मनोहर मोरे (रा.चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या. माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेशी शारिरिकसबंध प्रस्थापित केले.

मुलांना मारण्याची धमकी देऊन तसेच हाताने मारहाण करत वारंवार लैंगीक अत्याचार करण्यात आले. तसेच दुसऱ्या महिलेशी लग्न करत फिर्यादीची फसणूक केली.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.