Chinchwad Bye-Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची सांगवीत पदयात्रा, मतदारांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ढोल, ताशांचा गजर, मन गुंगणारी ताला-सुरातील विकासाची गाणी (Chinchwad Bye-Election) नागरिकांना ऐकवत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची गुरुवारी सांगवीत पदयात्रा निघाली. या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

पदयात्रेची सुरुवात जुनी सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरापासून झाली. उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी दोघांनाही खांद्यावर उचलून घेतले होते.

Pune : हिंदू जनजागृती समितीची संस्कृती रक्षण आणि पर्यावरण रक्षण मोहीम !

पदयात्रा शितोळेनगर मार्गे आनंद नगर, दाते नगर, गंगा नगर, ढोरे नगर, पवना नगर, मुळा नगर, मुठा नगर, संगम नगर, ममता नगर, मधूबन सोसायटी, ममता नगर, नवी सांगवी ते पिंपळे गुरव, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्ण नगर, काटे पूरम चौक, रामकृष्ण चौक, शिवाजी चौक, पिंपळे गुरव गावठाण, सृष्टी चौक, कल्पतरू, काशीद पार्क असा दीर्घ पद यात्रेचा मार्ग होता. पिंपळेगुरव येथे पदयात्रेची सांगता (Chinchwad Bye-Election) झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.