Pune : हिंदू जनजागृती समितीची संस्कृती रक्षण आणि पर्यावरण रक्षण मोहीम !

एमपीसी. न्यूज – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा (Pune) घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी बुधवारी (दि.22) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले.

सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेल्या खडकवासला जलाशय रक्षण मोहीमेच्या 20 वर्षांतील यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती सांगितली. निवेदने सादर करताना समितीचे कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते प्रत्यक्ष उपस्थित होते.

खालील ठिकाणी निवेदन देण्यात आले –

1 पुणे जिल्ह्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी किरण सुरवसे यांना निवेदन देण्यात आले.

2 जिल्हाधिकारी कार्यालय पुणेचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. ‘आमच्या कडूनही या मोहिमेसाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल’, असे त्यांनी सांगितले.

3 खडकवासला पाटबंधारे विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेले निवेदन त्यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता रा.ए. उबाळे यांनी स्वीकारले.

4. पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने पुणे पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अधीक्षक अभियंता रा.वि.सावंत यांनी निवेदन स्वीकारले.

5. पुणे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

6. पोलीस उपायुक्त विशेष शाखा, पुणे शहर यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

स्थानिक, प्रशासन आणि समाज यांची सांगड घालून आणि गेली 20 वर्षे सातत्याने समिती अत्यंत चांगल्या प्रकारे मोहीम 100% यशस्वीपणे पार पाडत आहे हे खूपच चांगले कार्य आहे. असा सकारात्मक प्रतिसाद सर्वांकडून लाभला. तसेच समितीला या मोहीमेसाठी आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.