Nigdi News: भाजप शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या निगडी, प्राधिकरणातील जनसंपर्क कार्यालयाचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. नागरिकांच्या सेवेसाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरु राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुप मोरे, विजय शिनकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग तथा पांडा साने, सुनील कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 समीर जावळकर म्हणाले, ”जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निगडी, प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेची सेवा केली जाईल. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यांच्या अडी-अडचणीला धावून गेले पाहिजे. सामाजिक भान ठेवून लोकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिब्ध आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.