Nigdi News : नंदकुमार इंगळे यांना ‘कलारत्न’, लक्ष्मण शिंदे यांना ‘समाजभूषण’ तर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ‘समाज मित्र’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने नंदकुमार इंगळे यांना ‘कलारत्न’, लक्ष्मण शिंदे यांना ‘समाजभूषण’ तर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ‘समाज मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ऑनलाईन विचार प्रबोधन पर्वाचे 1 ते 5 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने आज (गुरुवारी) पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर महोत्सवाची सांगता झाली. उद्योजक विरेंद्रसिंह शितोळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, काशिनाथ नखाते, अजित शेलार, डॉ. महेश दनाने यांना महापौर ढोरे यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह यासह समाज मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तर, डॉ. यशवंत इंगळे, डॉ. धनंजय भिसे, अ‍ॅड.सागर अडागळे यांचा विशेष प्राविण्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष संजय ससाणे, सचिव शिवाजी साळवे, खजिनदार नितीन घोलप, मुख्य संघटक वसंत वावरे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, मोहन वाघमारे, आबा मांढरे, संदिप जाधव, संतोष नेटके, सुरेश मिसाळ, विष्णू लोखंडे, विष्णू गायकवाड, संजय ढावरे, राजु आवठे, मधुकर गवारे, सविता आव्हाड, मुख्य मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे, प्रल्हाद सुधारे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, हनुमंत कसबे, सुरेश जोगदंड, अण्णा लोखंडे, रामदास कांबळे, सुनिल भिसे, झुंबरताई शिंदे, केसरताई लांडगे, आशा शहाणे, अरुण जोगदंड, सतिश भवाळ, दत्तू चव्हाण, राम पात्रे, रविंद्र खिलारे, सहसचिव विठ्ठल कळसे, राजेश अडसूळ, तानाजी साठे, गणेश साठे, उमेश कांबळे, सहखजिनदार बालाजी मोरे, विजय कांबळे, सल्लागार मोहन भिसे, अनिल सौदंडे, महेश खिलारे, सोशल मिडीया प्रमुख किशोर हातागळे, ऋषिकेश कसबे, पसिध्दी प्रमुख विशाल कसबे, संतोष रणसिंग, संघटक बालाजी गवारे, अविनाश लांडगे, सूत्रसंचालक भानुदास साळवे, महिला कमिटी कुसुम कदम, मिना कांबळे, पुनम क्षीरसागर, अन्नदान समिती अण्णासाहेब कसबे, संरक्षण समिती प्रमुख स्वप्रिल वाघमारे, मयूर घोलप, अक्षय उदगीरे, आकाश अडागळे उ पस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.