Nigdi News: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते रविवारी समाजदूत पुरस्कार प्रदान सोहळा

एमपीसी न्यूज – निगडी येथील सृजन प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या समाजदूत या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम येत्या रविवारी (23 जानेवारी) दुपारी 12 वाजता पाडळी (ता. शिरूर, जि. बीड) येथे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

जालना येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीमंत मिसाळ,दैनिक दिव्य लोकप्रभाचे संस्थापक, संपादक संतोष मानूरकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट,आणि पाडळीग्रामचे भूषण प्रथम श्रेणी अधिकारी अभिजित पाखरे यांना यावर्षी गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी व विवेक कुलकर्णी यांनी दिली.

पाडळी येथील दिवंगत शिक्षक दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मुलांनी स्थापन केलेल्या सृजन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजातल्या तेजस्वी आणि सामाजिक ऋण जपणाऱ्या देवदूतांचा हृदय सत्कार करून पुढील अनेक पिढ्यांना एक संदेश देणे या अभिनव उपक्रमाचाच हा एक भाग आहे.

प्रथम वर्षी निगडी पुणे येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार, साहित्यिक सुरेश कंक आणि प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ अभय दिवाण यांना गौरविण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.