Pimpri News : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 19) दुपारी सव्वाएक वाजता उदयनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

सुनील सुंदर सानील (वय 32, रा. घरकुल चिखली), सुरज संजय पाटील (रा. आळंदी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा त्याच्या टपरीमधून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सुनील याच्या टपरीवर कारवाई केली. त्यावेळी आरोपी सुरज हा त्याच्या दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी तिथे आला होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून 15 हजार 869 रुपयांचा गुटखा, एक मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण 82 हजार 869 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.