Nigdi News : एनडीएच्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सावरकर मंडळाकडून अभ्यासवर्ग

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत. एनडीए, सैन्यदलातील करिअरच्या संधी, प्रवेशप्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी रविवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता विद्यार्थी अन् पालकांच्या मेळाव्यात ब्रिगेडिअर बलजितसिंह गिल (नि.) आणि ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि.) हे मार्गदर्शन करणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षी हे अभ्यासवर्ग घेतले जातात. या प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून आतापर्यंत सहा विद्यार्थी एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. या वर्गासाठी फक्त चाळीस विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था मंडळाकडून केली जाणार आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक असून नोंदणी व अधिक माहितीसाठी 8446422965, 8698695246 किंवा 8554023007 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने भास्कर रिकामे आणि रमेश बनगोंडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.