Nigdi : कालीमातेच्या मूर्तीवरील दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील कालीमाता मूर्तीवरील दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना संभाजीनगर कस्तुरी मार्केटच्या मागे कालीमाता मंदिरात सोमवारी (दि. 11) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.

मृणाल कांती चक्रवर्ती (वायू 75, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर मधील कस्तुरी मार्केटच्या मागच्या बाजूला कालीमाता मंदिर आहे. शनिवारी (दि. 10) रात्री साडेआठ ते रविवारी (दि. 11) सकाळी सहाच्या दरम्यान मंदिर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.