Nigdi : शहरात पोलिसांचे रूट मार्च आणि कोम्बिग ऑपरेशन

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकांमुळे पोलिसांनी आपल्या कारवायांमध्येही वाढ केली आहे. शहरात ठिकठिकाणी रूट मार्च करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी भागांमध्ये दिवसा आणि रात्रीही कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई वाढविल्याने गुन्हेगारांची एकच पळापळ सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरवात केली आहे. नागरिकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी निगडी पोलिसांनी शनिवारी सकाळी साडेदहा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान निम लष्करी दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह निगडीच्या यमुनानगर, साईनाथ नगर, निगडी गावठाण, अजंठा नगर, थरमॅक्‍स चौक या भागातून रूट मार्च काढला. तर सायंकाळी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्वरित भागात रूटमार्च करण्यात आले.

पिंपरीत कोम्बिंग ऑपरेशन

पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी परिसरात पोलीस उपायुक्‍त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये स्थानिक पोलिसांसह निम लष्करी दलाचे जवान सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.