Nigdi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेचे 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.

सुषमा देवीदा पाटील (वय 48, रा. बिजलीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी सुषमा निगडी प्राधिकरण येथील संभाजी चौकाजवळ रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.