Nigdi : धर्माचा खरा अर्थ पूजाअर्चा नव्हे कर्तव्य

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – धर्माचा अर्थ पूजाअर्चा एवढ्यापुरता मर्यादित (Nigdi) नाही. तर धर्म म्हणजे कर्तव्य आहे. धर्म शब्दाचा अर्थ हल्ली वेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे. आपले कर्तव्य ओळखून आपण वागणे गरजेचे आहे. वैचारिक क्रांतीच्या प्रक्रियेतून देश जात असल्याचे मत प्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे चौथे पुष्प पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी गुंफले. यावेळी ते ‘हिंदू समाजापुढील आजची आव्हाने’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे राकेश वाल्मिकी, तसेच विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

देशात पारशी, बौद्ध, शीख हे तीन समाज मिळून पाच टक्के आहेत. हे समाज खऱ्या अर्थाने अल्पसंख्यांक आहेत, असे सांगत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, “राजकीय नेत्यांच्या आश्वासनांना भुलून आपण त्यांना सत्तेवर बसवतो. दोन रुपये किलो धान्य आणि दोन महिन्यांचे वीजबिल माफ केले तरी जनता आपल्याला सत्ता देते, ही नस राजकारणी लोकांनी जाणली आहे. हे आपले दुर्भाग्य आहे. सावरकर होण्यासाठी सत्तेला लाथ मारावी लागते.

Pune : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे उद्घाटन

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले, “सनातनी समाज हल्ली भौतिक सुखात अडकत जात आहे. त्यात अडकून न पडता ज्ञानावर भर दिला पाहिजे. जो ज्ञान प्राप्त करतो, तो ब्राह्मण आहे. एखादा सैनिक शहीद होतो तो खरा क्षत्रिय आहे. ब्राह्मण घरात जन्म घेतल्याने कोणी ब्राह्मण होत नाही. तर त्याच्या कर्माने होतो. सत्यात खूप ताकद (Nigdi) आहे. सत्याला प्रत्येकजण घाबरतो. पण सत्यावर ठाम राहिलो तर अनेकजण आपल्यासोबत येतील.”

स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढे खरे लढवय्ये कोणी नाही. देशापेक्षा राष्ट्र मोठे असते. राष्ट्र आस्थेवर चालते. राष्ट्राला आस्था चालवते. हिंदुधर्म हा कर्मप्रधान धर्म असल्याचेही कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

उज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन, आभार व्यक्त केले. शिल्पा बीबीकर यांनी परिचय करून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.