Nigdi: पालिकेतर्फे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

Nigdi: Tributes to Lokmanya Tilak on behalf of the municipality महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

एमपीसी न्यूज – भारतीय जनतेत स्वराज्याची अस्मिता निर्माण करणारे व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करुन तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आरोग्याधिकारी मारुती शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.