Nigdi : उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून ट्रक उलटला (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून ट्रक उलटला. ही घटना आज (सोमवारी) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निगडी मधील पवळे उड्डाणपूल येथे घडली.

निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मालवाहतूक ट्रक (के ए 32 / सी 6381) पुण्याहून निगडीच्या दिशेने जात होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निगडी मधील पवळे उड्डाणपुलावरून जात असताना उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक उलटून दुस-या लेनमध्ये पडला.

त्यामुळे निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणारी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ट्रकची पुढची दोन्ही चाके निखळली आहेत. त्यामुळे ट्रक बाजूला करण्यात काही अडचणी येत आहेत. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

पुलावरील एका लेनची वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. यामुळे सेवा रस्त्यावर ताण आला असून वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या आहेत. काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून कोंडी सोडविण्याचे काम सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=5dJBOmf10QU&feature=youtu.be

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.