Nigdi : प्रवासी म्हणून बसलेल्या चार जणांनी दमदाटी करून कार पळवली

एमपीसी न्यूज – प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या चार जणांनी कारचालकाला दमदाटी करून कार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान रविवारी (दि. 13) रात्री घडली.

विशाल नागनाथ रणदिवे (वय 20, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 13) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी रणदिवे हे मारुती सुझुकी (एमएच 12 / एनबी 0818) या कारमधून चार प्रवासी घेऊन संभाजी नगर-चिंचवडहून कात्रजच्या दिशेने जात होते. ते कात्रज घाट येथे आले असता प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी रणदिवे यांची कार तसेच त्यांच्याकडील 15 हजाराचा मोबाईल फोन व 150 रूपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 15 हजार 150 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.