PMPML bus stop : यमुनानगर कॉर्नर येथील PMPML चा बस थांबा पुलाखाली करावा – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज – निगडी यमुनानगर कॉर्नर येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा नाही. (PMPML bus stop) प्रवाशांना उन, वारा, पावसात थांबावे लागते. त्यामुळे हा थांबा मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये बी आरटीबस स्टॉप या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली.

याबाबत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया यांना निवेदन दिले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, निगडी यमुनानगर कॉर्नर येथून भोसरी मार्गे चाकण भोसरी देहूगाव, आळंदी, मरकळ शिंदे वासुली म्हाळुंगे हडपसर या ठिकाणी पीएमपीएमएल बस धावतात. रोज हजारो प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात.  त्या ठिकाणी प्रवाशांना निवारा शेड बांधण्यात आले नाही. शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना ऊन वारा पाऊस या तीन ऋतू मध्ये तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. तसेच निगडी येथील भोसरी बस स्टॉप या ठिकाणी रस्त्यावर रिक्षा तासन-तास उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

Chikhali crime : पायी जाणाऱ्या तरुणाला अडवून मारहाण करत लुटले

फुटपाथवर टपरीधारक यांनी अतिक्रमण केले आहे. प्रवासी बांधवांना रस्त्यावर भोसरी बस स्टॉप या ठिकाणी बस येण्याची वाट पाहावी लागत आहे.(PMPML bus stop)  तर, दुसरीकडे भोसरी मार्गे निगडी यमुनानगर कॉर्नर या ठिकाणी बस स्टॉप उपलब्ध नाही. त्यामुळे मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्किंगमध्ये बीआरटीबस स्टॉप या ठिकाणी भोसरी निगडी बस स्थानक स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.