Chikhali crime : पायी जाणाऱ्या तरुणाला अडवून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज पायी जाणाऱ्या तरुणाला अडवून तीन ते चार जणांनी (Chikhali crime) मारहाण करत लुटले आहे. ही घटना चिखली येथे आंगणवाडी रोडवर बुधवारी (दि.9) रात्री घडली.

तुळशीराम भार्गव जाधव (वय 50 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चार अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bhosari News: अण्णासाहेब मगर सहकारी बँकेतील वाढीव शेअर्सच्या कार्यवाहीसाठी प्राधिकृत अधिका-याची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रसीक हा रात्रपाळीसाठी बसने जाण्यासाठी निघाला. त्यावेळी एका आरोपीने रसीकला अडवले त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी रसीक याने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली.(Chikhali crime) तसेच मोबाईल मागितला. यावेळी फिर्यादी यांनी माबोईल देखील नसल्याचे सांगितले.आरोपीने त्याच्या साथीदारांना हाक मारून हाताने व काचेच्या बाटलीने तसेच सिमेंटच्या गट्टूने मारून रसीक याला गंभीर जखमी केले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.