Nigdi : विनाकारण तरुणाला मारहाण; कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या मोकळ्या जागेत थांबलेल्या तरुणाला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तरुणाच्या कुटुंबातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री साडेअकराच्या सुमारास अजंठा नगर मधील तिरंगा हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात घडली.

रमेश मोहन इंगवले (वय 28, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अंजठा नगर, चिचंवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश रघुनाथ बनसोडे (रा. अशोक हाऊसिंग सोसायटी, अंजठानगर, चिंचवड), आदेश संजय गायकवाड आणि सुशांत सुभाष गायकवाड (दोघे रा. तक्षशीला हाऊसिंग सोसायटी, अंजठानगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिरंगा हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात थांबले होते. त्यावेळी गणेश याने येऊन ‘काय रे तुझी लय नाटकं चालू आहेत का’ असे म्हणून लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. दरम्यान (एम एच 14 / सी एक्स 0918) या कार मधून आदेश आणि सुशांत आले. त्यांनी सोसायटी परिसरात दगडफेक केली. यामध्ये रमेश यांना गंभीर इजा झाली. तसेच सोसायटीच्या फलकाचे देखील नुकसान झाले. यानंतर आरोपींची रमेश यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<