Rajgad fort : राजगडावर रात्री मुक्कामास बंदी; पुरातत्व विभागाचे आदेश

एमपीसी न्यूज : राजगड किल्यावर रात्री मुक्कामासाठी जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा. गडावर कचरा आणि घाण होत असल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने (Rajgad fort) राजगड किल्यावर रात्री मुक्कामाला बंदी घातली आहे.  या आदेशाचा दुर्गप्रेमींनी निषेध केला आहे.

राजगडावर अनेक दुर्गप्रेमी आणि पर्यटक येत असतात. अनेक पर्यटक रात्री टेंट बांधून या ठिकाणी मुक्काम करत असतात. दरम्यान, या मुळे गडावर अस्वच्छता होत असून अनेक पर्यटक कचरा करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपण्यासाठी या गडावर रात्रीच्या मुक्कामी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र हे भोर उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.

Shinde-Fadnavis Govt : शिंदे-फडणवीस सरकार आता बॉलीवूडवर नियंत्रण आणणार; लवकरच नियमावली लागू करणार

या संदर्भात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले, की राजगड किल्यावर अनेक पर्यटक रात्रीच्या मुक्कामाला येत असतात. (Rajgad fort) दरम्यान, या पर्यटकांकडून चूल पेटवून तसेच या परिसरात कचरा टाकला जात असल्याच्या अनेक घटना पुढे आल्याने या गडावरील पर्यटकांचा रात्रीचा मुक्काम हा बंद करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर सह्याद्री ट्रेकर्सने निषेध व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.