Shinde-Fadnavis Govt : शिंदे-फडणवीस सरकार आता बॉलीवूडवर नियंत्रण आणणार; लवकरच नियमावली लागू करणार

एमपीसी न्यूज : बॉलिवूडसह मनोरंजन क्षेत्रातील निर्माते व अन्य कलाकारांच्या मनमानीला आता राज्य सरकारकडून चाप लावला जाणार आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आता नवीन नियमावली आणण्याच्या विचारात आहे. (Shinde-Fadnavis Govt) चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार समान काम समान वेतन द्यावे लागणार आहे. ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

या एसओपीच्या मार्फत सरकार बॉलीवूडवर व मनोरंजन विश्वावर नियंत्रण आणणार आहे. बॉलीवूड मधील कामगार, कलाकार व निर्मात्यांसाठी नवीन नियमावली (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांवर कामगार व कलाकारांची जबाबदारी असेल. चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेब सिरीज यांना एसओपी लागू करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कामगार व कलाकारांचे शोषण थांबवण्यासाठी एसओपी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे बंधनकारक असेल.

Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 26 – देवपुत्र अजिंक्य

बॉलीवूडसह मनोरंजन क्षेत्रात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळत नाही, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णायानंतर यापुढे कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार द्यावे लागणार आहे.  ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे नव्या नियमावलीत कलाकार व कामगारांनाही अचानक काम बंद करून निर्माते व दिग्दर्शकांना वेठीस धरता येणार नाही. (Shinde-Fadnavis Govt) महत्त्वाचे म्हणजे कलाकार व कामगारांना कोणतीही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी एक नवे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.  या पोर्टलवर चित्रपट सृष्टीत उपलब्ध असलेल्या कामाची माहितीही कलाकार व कामगारांना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.