Nilesh Varaghde Murder : अखेर वास्तूतज्ञाचा मृतदेह सापडला 17 दिवसांनी!

एमपीसी न्यूज – दागिन्यांच्या हव्यासापोटी (Nilesh Varaghde Murder) अपहरण करून खून करत मृतदेहाला नदीत फेकून देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणात आरोपी आधी सापडले अन मृतदेह पोलिसांना 17 दिवसांनी हाती लागला.

बिबेवाडी येथे राहणारे निलेश दत्तात्रय वरघडे हे 16 ऑक्टोबर पासून बेपत्ता होते. याप्रकरणी बिबोवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता वरघडे यांचा गाडीचा चालक दीपक जयकुमार नरळे (वय 29) देखील बेपत्ता होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत नरळे व त्याच्या साथीदाराला अटक केले. यावेळी त्यांनी वरघडे यांच्याकडील 25 तोळे सोन्यासाठी त्यांना कॉफीमध्ये झोपेचे औषध देत दोरीने गळा आवळून खून केल्य़ाचे कबुल केले. यावेळी आरोपींनी वरघडे यांचा मृतदेह पोत्यात बांधून सारोळा येथील पुलावरून नीरा नदीत फेकून दिल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune District : पुणे विभागात 30 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतरही पोलिसांना मृतदेह शोधणे (Nilesh Varaghde Murder) आव्हान होते. त्यानुसार पोलिसांनी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी बिबेवाडी पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्कयू टीम, भोईराज आपत्ती संघ भोर, वाईल्ड वेस्ट अडव्हेंचर कोलार्ड रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य, स्थानिक मच्छिमार व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराज पटेल यांनी प्रयत्न करून 17 दिवसांनी मृतदेह शोधून काढला आहे. याचा पुढिल तपास बिबेवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.