Shirur : गटार साफ करताना दोन सफाई कामगारांचा चेंबरमध्ये बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : शिरूर औद्योगिक वसाहतीतील (Shirur) एका कंपनीत काल (4 नोव्हेंबर) भूमिगत गटार साफ करताना चेंबरमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेत मच्छिंद्र दादाभाऊ काळे (वय 42, रा. शिरूर) आणि सुभाष सुखदेव उघडे (वय 34, रा. शिरूर) या घटनेत मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काळे व उघडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भूमिगत नाल्यांची सफाई करत होते. त्यावेळी उघडे हे अनवाणी पायांनी काम करत असताना त्यांचा तोल गेला, आणि ते घसरून चेंबरमध्ये पडले. त्याला बाहेर काढण्यासाठी काळे यांनी चेंबरमध्ये उडी घेतली. मात्र, दोघेही बाहेर आले नाहीत.

Nilesh Varaghde Murder : अखेर वास्तूतज्ञाचा मृतदेह सापडला 17 दिवसांनी!

नंतर त्यांना इतरांनी बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल (Shirur) केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी शिंदोडी, शिरूर येथील रहिवासी दत्तात्रय दादाभाऊ काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरजिने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.