Pune Crime : दुचाकीतुन पेट्रोल काढताना पकडल्याने एकाच कुटुंबातील तिघांवर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतून पेट्रोल काढताना पकडल्याने चोरट्यांनी एकाच कुटुंबातील तिघांवर धारदार शस्त्राने वार केले. शनिवारी मध्यरात्री बिबेवाडीतील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी यातील दोन चोरट्यांना पकडले असून अन्य एक फरार झाला आहे.

तुषार पोपट फडतरे (वय 29) पोपट बाबुराव फडतरे (वय 55) आणि सुनिता फडतरे (वय 49) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तुषार फडतरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार फडतरे हे बिबवेवाडीतील पुरंदर निवास येथे राहतात. शनिवारी मध्यरात्री त्यांनी पार्क केलेल्या दुचाकीच्या ठिकाणी कसातरी आवाज आल्यामुळे त्यांनी खाली येऊन पाहिले असता तिघेजण दुचाकीतून पेट्रोल काढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादी यांनी भाडेकरूंच्या मदतीने त्यातील दोघांना पकडले तर एक जण पळून गेला.

दरम्यान पळून गेलेल्या चोरट्याने आणखी काही साथीदारांना घेऊन त्या ठिकाणी परत आला आणि त्याने फिर्यादी आणि त्यांच्या आईवडिलांसोबत भांडण केले. आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. आणि आरोपी पसार झाले सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास बिबेवाडी पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.