New Delhi News : कोरोना रुग्णांसाठी पुण्यात बेडस मिळत नाहीत : गिरीश बापट यांनी लोकसभेत उठवला आवाज

पुण्यात रोज दीड ते दोन हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 60 ते 70 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेडस मिळत नाहीत, व्हेंटिलेटरवर मिळत नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आयटी, उद्योग, शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेले पुणे आता कोरोनामध्ये प्रथम आले आहे. हे चित्र बदलण्याची गरज असल्याची मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आज, सोमवारी लोकसभेत केली.

कोरोनाने पुण्यात कहर केला आहे. 20 आयएएस अधिकारी असूनही पुण्यातील कोरोना काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने टास्क फोर्स पाठवून कोरोना आटोक्यात आणावा, असेही बापट म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यात रोज दीड ते दोन हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 60 ते 70 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे. त्यामुळे पुणेकर प्रचंड घाबरलेले आहेत. राज्य शासनाने वरिष्ठ अधिकारी नियुक्त केले मात्र त्यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 2 लाख पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 5 हजार पेक्षा जास्त रुग्णाचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.