Pimpri : नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांचे यश 

तीन विद्यार्थी प्रशिक्षणासाठी दुबईला रवाना

एमपीसी न्यूज – नॉव्हेल एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या  खुशी पटेल, संकेत पागे, अंजली रणधीर या तीन विद्यार्थ्यांची  दुबई येथील जगप्रसिध्द मॅरियट मार्केक्विस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
चिंचवड  येथील एनआयबीआर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, प्राचार्य वैभव फंड, शिक्षक, शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. 
_MPC_DIR_MPU_II
 विद्यार्थ्यांची ही नेमणुक ही कोणत्याही प्लेसमेंट एजन्सीमार्फत झाली नसून कॉलेजच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांतून ही संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग भरारीचे कौतुक करताना अमित गोरखे म्हणाले,  विद्यार्थ्यांचे अभ्यासातील परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे संस्कार हे जडण-घडणीचे आधारस्तंभ आहे. या तीनही विद्यार्थ्यांना गोरखे .यांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 प्रा. वैभव फंड म्हणाले की, विद्यार्थ्यांचे हे यश पालकांची आणि संस्थेची मान उंचावणारी आहे. विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा होईल.यावेळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंतनु देशपांडे यांनी केले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.