Pune : महापालिकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त 73 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी 73 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, नगरसेवक राजेश येणपुरे, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यावेळी उपस्थित होत्या.

हे रक्त ससून सर्वोपचार रुग्णालयाकडील गरीब व गरजूंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रक्तदानासारख्या श्रेष्ठदानाचे शिबिर आयोजित केल्याबद्दल ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीचे अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like