Pimpri News: ‘वर्धापनदिनी प्रत्येक विभागाने पुढील 10 वर्षाचा आराखडा तयार करावा’

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या सूचना  

एमपीसी न्यूज – महापालिका वर्धापनदिनापासून म्हणजेच 11 ऑक्टोबर पासून पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठीची मोहिम सुरु करावी. तसेच भविष्याचा वेध घेणारे चर्चासत्र आयोजित करावे.  प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील कामकाजाचा पुढील 10 वर्षाचा आराखडा तयार करुन त्याचे सादरीकरण वर्धापनदिनी करावे, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 39 वा वर्धापन दिन 11 ऑक्टोबर 21 रोजी आहे.  त्या निमित्ताने महापालिकेच्या दिवंगत मधूकरराव पवळे सभागृह येथे वर्धापन दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, रविकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, विजय थोरात, सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सह शहर अभियंता संदेश चव्हाण, कर्मचारी महासंघाच्या सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, गोरख भालेकर, गणेश भोसले, योगेश रसाळ, योगेश वंजारे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून उत्कृष्ठ कामकाज करणा-या सामाजिक कार्यकर्त्याचा कोवीड योध्दा म्हणून सन्मान करावा. महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.  कोरोना काळात काम करणा-या सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात यावा, कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपणा-या स्वयंससेवकांचा देखील सत्कार करण्यात यावा.

शहरातील कष्टकरी व कामगार महिलांकरीता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासाठीचे  नियोजन वर्धापनदिनापासून करावे अशा सूचना महापौर ढोरे यांनी प्रशासनास दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.