Vadgaon Maval News : मावळ वासियांना मिळणार वैचारिक मेजवानी; नवरात्रोत्सवानिमित्त 7 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘सरस्वती’ व्याख्यानमालेचे आयोजन!

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील मावळ विचार मंचच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला 7 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्यान देणार आहेत. यातून मावळ वासियांना ज्ञानाची वैचारिक मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती मंचचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्याख्यानमालेचे हे 21 वे वर्ष आहे. 

यावेळी मंचच्या कार्याध्यक्ष वैशाली म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख श्रेया भंडारी, उपाध्यक्ष मनोज भांगरे, सचिव गिरीश गुजराणी, खजिनदार अजित वहिले, संचालक विजय जाधव,भूषण मुथा, अनंता कुडे,अतुल राऊत,अरुण वाघमारे, नंदकिशोर गाडे, कल्पेश भोंडवे उपस्थित होते.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात दररोज सायं 6:30 वाजता सन्माननीय वक्त्यांची व्याखाने होणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी डॉ. मोनिका ठक्कर (भारुडातील स्त्री रूपे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार असून, यानंतर अनुक्रमे जयवंत आवटे (कथाकथन), कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (महिलांवरील अत्याचार व कायद्याची अंमलबजावणी), युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर (मानवी जीवन व संत साहित्याची आवश्यकता), पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (सोशल मीडिया आणि सामाजिक भान), साखर आयुक्त शेखर गायकवाड (प्रॉपर्टी आणि माणूस), प्रा. सचिन ढोबळे (छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रोद्धार) आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे (आयत्या वेळेचा विषय) यांची व्याख्याने होणार आहेत.

अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहूणे म्हणून अनुक्रमे सभापती ज्योती शिंदे व मुख्याधिकारी जयश्री काटकर, खासदार श्रीरंग बारणे व संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे व गटविकास अधिकारी सुधीर भागवत, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ व उद्योजक नंदकुमार शेलार, पद्मश्री डॉ गिरीश प्रभुणे व प्रा. दिगंबर ढोकळे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, पिंपरी चिंचवड आमदार लक्ष्मण जगताप व  अधिक्षक अभियंता महावितरण पुणे राजेंद्र पवार, मावळचे आमदार सुनील शेळके व जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान 7 ऑक्टोबर रोजी आग्रा ते राजगड या गरुडझेप मोहिमेत सहभागी झालेल्या वडगावमधील युवकांचा सन्मान तर 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदके पटकवणारे चिराग वाघवले, शुभम तोडकर, रुचिका ढोरे, हर्षदा गरुड, सिद्धांत बिंदे या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त भारतमाता प्रतिमेची मिरवणूक काढून समारोप होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.