Pune Crime News : पहिले लग्न झाले असतानाही दुसरीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेले असतानाही दुसऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी सुनील छजलानी (वय 33, फ्लॅट नं 1004, इव्हज गार्डन, केशव नगर मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सनी याचे यापूर्वीच लग्न झाले होते. परंतु लग्न झाल्याचे लपवून त्याने फिर्यादी तरुणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मार्च 2020 ते मे 2022 या काळात त्याने तिच्यासोबत वेळोवेळी संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने लग्नाविषयी विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि फिर्यादीला हाताने मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.