Pune Crime News : वर्षभरापासून नोकरी नाही, जीवरक्षक व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मागील वर्षभरापासून नोकरी नसल्याने एका बेरोजगार व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दत्ता पुसीलकर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जंगली महाराज रस्त्यावरील नांदे जलतरण तलाव या ठिकाणी जीवरक्षक म्हणून काम करत होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुशीलकर हे केशव नगर परिसरातील कुंभारवाडा या ठिकाणी आईसह राहत होते. मागील अनेक वर्षापासून ते बालगंधर्व रंगमंदिर जवळ असलेल्या महानगरपालिकेच्या नांदे जलतरण तलावामध्ये जीवरक्षक म्हणून काम करत होते. कोरोना संसर्गामुळे 1 मार्च 2020 पासून शहरातील सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मार्चपासून  पुसीलकर त्यांची नोकरी गेली होती. त्यांनी अनेक ठिकाणी काम मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काम मिळत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी रविवारी राहत्या घरात गळफास घेतला.

दरम्यान सायंकाळी घरी आलेल्या त्यांच्या आईंना पुशीलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुशीलकर यांना खाली उतरून रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.